भिमाशंकर चा २६९० चा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
दत्तात्रयनगर,पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व कारखान्याचे संस्थापक-चेअरमन दिलीपराव वळसे पा, यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत गाळप हंगाम २०१९-२० मध्ये गाळप केलेल्या ऊसास एफ.आर.पी. नुसार प्रथम हप्ता रु. २६९०/- प्र.मे.टन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दि. २७ डिसेंबर रोजी ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खात्यावर ऊस बिलाची रक्कम वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.